मुकेश अंबानी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट!
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचे निमंत्रण सोनिया गांधींना दिल्याचे सुत्रांनी सांगितले. सोनिया गांधींच्या १० जनपथ या निवासस्थानी सुमारे तासभर ही भेट चालली.अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे निमंत्रण अनेक दिग्गज लोकांना दिला जात आहेत. काही पाहुण्यांना निमंत्रण देण्यासाठी खुद्द मुकेश अंबानी जात आहेत. गेल्या महिन्यात २६ जून रोजी मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलैला लग्नमुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. या लग्नापूर्वी अनेक कार्यक्रमही पार पडत आहेत. बुधवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याचा एक भाग म्हणून एक कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये संपूर्ण अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय सहभागी झाले होते. तत्पुर्वी त्यांच्या लग्नपुर्व प्री-वेडींग कार्यक्रमात देश-विदेशातील बड्या उद्योजकांसह सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते.