चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळीतील ते खड्डे भरण्यास सुरूवात
चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथील खड्डे भरण्यास मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. अनेकजण जायबंदी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही कार्यवाही सुरू केली आहे. मात्र यामुळे मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.चिपळूण-गुहागर मार्गाचे रूंदीकरण होत असल्याने गेल्या काही वर्षापासून रस्त्याची दुरूस्ती व गटारे बांधण्याची कामे थांबवण्यात आली आहेत. याचा परिणाम म्हणून गटार नसल्याने व असलेली मोरी बंद राहिल्याने डोंगरातून येणारे पावसाचे पाणी थेट गुहागर मार्गावर येवून रस्त्याला नदीचे रूप येत होते. काही दिवसांपूर्वीच तब्बल २० वर्षांनी मोरी मोकळी केल्याने सध्यातरी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत आहे.www.konkantoday.com