शासकीय रूग्णालयात प्लेटलेटसची टंचाई प्लेटलेटसची उपलब्धता कमी असल्याने शासकीय रूग्णालयात प्लेटलेटसची टंचाई भासत आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे १२७ रूग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये एकट्या रत्नागिरी तालुक्यात ९० तर ग्रामीण भागात ३४ रूग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात तसेच ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांची उपलब्धता कमी आहे. मात्र जिल्ह्यातील डेंग्यूची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांशी समन्वय साधून उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच सध्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेसा औषधपुरवठा असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्तातील प्लेटलेटसचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com