
‘फिनोलेक्स’च्या प्रीतिश दीक्षितने राष्ट्रीय स्पर्धेेत केले मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजीचा प्रीतिश दीक्षित (तृतीय वर्ष, इलेक्ट्रिकल) याने के.आय.आय.टी (कलिंगा इन्स्टिट्यूटऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी) भूवनेश्वर येथे आयोजित केलेल्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत योगा क्रीडा प्रकारात मुंबई विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व करताना संघाला 11 वा क्रमांक प्राप्त करून दिला. ही स्पर्धा 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भूवनेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये देशातल्या विविध 120 विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. याच स्पर्धेसाठीची संघ निवड चाचणी मुंबई येथे बी. के. बिर्ला महाविद्यालयात 20 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली होती. तेथे प्रीतिश दीक्षित याने प्रथम क्रमांक पटकावत मुंबई विद्यापीठ संघात आपले स्थान निश्चित केले होते. मुंबई येथे संघ निवड चाचणीमध्ये निवड झालेले मुंबई विद्यापीठ संघाचे 6 खेळाडू भूवनेश्वर येथे आयोजित केलेल्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाले. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, डीन फॅकल्टी व क्रीडा प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
www.konkantoday.com