तुरळ हरेकरवाडी येथे बोलेरो आणि दुचाकी अपघात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ हरेकरवाडी येथे बोलेरो आणि दुचाकी अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बोलेरो चालक व त्यातील अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. धामणी पेट्रोल पंपावर काम करणारा विघ्नेश आत्माराम करंडे वय वर्षं २१, राहणार तुरळ पाचकलेवाडी हा एमएच ०८/Aइ४६९२ पॅशन प्रो दुचाकीने आरवली ते धामणी प्रवास करताना धामणी ते आरवलीच्या दिशेने सुसाट वेगात येणार्‍या एमएच०८/Aइ४६९२ बोलेरो वाहन चालक परेश हेमंत देवरुखकर याचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जात दुचाकीला फरफटत नेले. यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर उडून गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बोलेरो ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या बोलेरो मधील चालक परेश देवरुखकर याच्या पायाला किरकोळ मार लागला असून बोलेरो मधून प्रवास तीन जण किरकोळ जखमी झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button