
खेड-चिपळूण मार्गावरील उशीरा धावणार्या बसेसमुळे प्रवासी हैराण झाले असतानाच आता गळक्या बसची समस्या
खेड-चिपळूण मार्गावर उशिराने धावणार्या तसेच आसनांचा अभाव असणार्या एसटी बसेसमुळे आधीच प्रवासी मेटाकुटीस आले असताना त्यात गळक्या एसटी बसेसमुळे मनस्तापात नवी भर पडली आहे. यामुळे काही प्रवासी खाजगी आरामबसचा आधार घेत आहेत.एकीकडे भर रस्त्यात बंद पडणार्या बसफेर्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. तसेच विलंबाने मार्गस्थ होणार्या व आसनांचा अभाव असणार्या बसफेर्यांमुळे प्रवासी त्रस्त आहेत. www.konkantoday.com