रत्नागिरी शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतही फिरणार कचरा गाडी

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२ अंतर्गत मार्च २०२५ अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून गावे हागणदारीमुक्त व अधिक उत्कृष्ट करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये शाश्‍वत स्वच्छता राखण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जि.प. प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रामध्ये निवासी संकुलाचे (अपार्टमेंट) प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीला असे निदर्शनास आले आहे की, शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रामधील निवासी संकुलामध्ये घनकचरा व्यवस्थापन सुविधा नसल्याने त्या निवासी संकुलामधील कचरा इतरत्र टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. तथापी शहरालगतच्या ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. तसेच त्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये निवासी संकुलाची संख्या अधिक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button