
‘त्या’ चोरट्यांना न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील दळवी कॅश्यू, गोळप सडा येथील साई मंदिर आणि चिपळूण येथील पानटपरी फोडून लाखोंचा ऐवज लांबवणार्या तीन संशयितांना न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी त्यांना शुक्रवारी 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
रज्जाक असलम मुजावर (वय 33, रा. नाग्रे सांगली बायपास पलूस रोड, इनाम पट्टी ता. मिरज, सांगली), साहिल इसाक सायनावाले (22, रा. करासवाडा म्हापसा, बार्देश नॉर्थ गोवा), अक्षय संतोष पाटील (24, रा. देवकाडगाव ता. आजरा, कोल्हापूर) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ग्रामीण पोलिसांचे पथक गोळप परिसरात पेट्रोलिंग करत असताना या संशयितांच्या कारचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले होेेते.
या प्रकरणी शुक्रवारी तिघांनाही न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.




