
दापोली शहरातील हर्णै रोडवर वाहतुकीस अडथळा प्रकरणी कारवाई
दापोली शहरातील दापोली ते हर्णे जाणार्या रोडवर उपजिल्हा रूग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर आयशर कंपनीचा ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दापोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांच्या माहितीनुसार २९ जून रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास दापोली-हर्णे रस्त्यावर उपजिल्हा रूग्णालयासमोर कुंदन बाबुराव शिर्के (२२, रा. सुसेरी तालुका खेड) याने आयशर कंपनीचा ट्रक (एमएच ०८ ए पी ०४३०) उभा करून ठेवला होता. यामुळे रस्त्याने येणार्या-जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक रस्त्याने जाणार्या पादचार्यांनाही धोका निर्माण होईल, अशी गाडी लावून कोठेतरी निघून गेल्याने दापोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.www.konkantoday.com