गणपतीपुळे येथील हॉटेलला क्वॉरंटाईन करण्याची परवानगी असताना देखील गुन्हे दाखल झाल्याने हॉटेल चालकांत नाराजी

रत्नागिरीच्या तहसिलदारांनी गणपतीपुळे येथील हॉटेल अभिषेक यांना परजिल्ह्यातून, परराज्यातून व परदेशातून येणार्‍या व्यक्तींना त्यांच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यास दि. १०.५.२०२० रोजी काही अटी घालून परवानगी दिली होती. परंतु नुकत्याच जयगड येथील दुरूस्तीसाठी आलेल्या बोटीवरील कर्मचार्‍यांना हाॅटेल मध्ये राहण्यास दिल्याच्या कारणावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने हॉटेल व्यावसायिकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असल्याने गणपतीपुळे येथील या हॉटेलमध्ये आपणहून क्वॉरंटाईन होवू इच्छिणार्‍या चाकरमानीना क्वॉरंटाईन होण्यासाठी हॉटेलला परवानगी दिल्याचे पत्र तहसिलदार यांनी दिले होते.
रत्नागिरीमधील अनेक हॉटेल चालकांनी चाकरमान्यांना क्वॉरंटाईन करण्यास हॉटेल देण्यास नकार दिल्याने प्रशासनास सहकार्य म्हणुन गणपतीपुळे येथील या हॉटेल चालकांनी आपल्या हॉटेलमध्ये चाकरमान्यांना क्वॉरंटाईन करण्यास सहकार्य केले होते त्याप्रमाणे शिरगांव भागातील एक महिला या आधी या हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन झाली होती. मात्र कालच्या प्रकरणात हॉटेल व्यावसायिकालाच दोषी ठरविण्यात आल्याने प्रशासनाची ही भूमिका कळू शकली नाही. या बोटीवरील कर्मचार्‍यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना स्वॅबच्याव टेस्टिंगसाठी नेण्यात आले होते. त्याचा अहवाल येण्यास दोन दिवस जाणार असल्याने ते या हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन होण्यास आले होते. हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन होणार्‍या कर्मचार्‍यांनी हॉटेलच्या रूमच्या व आवाराच्या बाहेर जाणे अपेक्षित नव्हते ही जबाबदारी हॉटेलची असली सध्या हाॅटेल मध्ये कमी कर्मचार्‍यांरी असल्याने त्याची नजर चुकवून हे क्वॉरंटाईन केलेले कर्मचारी गणपतीपुळे गावात गेले. त्यामुळे हॉटेल चालकावर कर्मचारी गावात गेल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.
क्वॉरंटाईन असताना देखील गावात फिरणार्‍या लोकांवर याआधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी हे क्वॉरंटाईन केलेले कर्मचारी हॉटेल सोडून बाहेर गावात फिरले. त्यांच्यावर मात्र कोणतेही गुन्हे अद्यापतरी दाखल झालेले दिसत नाही. यामुळे आधीच लॉकडावूनमुळे व्यवसाय बंद असल्याने अडचणीत असलेल्या हॉटेल व्यावसायिकानी प्रशासनाला सहकार्य कसे करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत लवकरच हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेवून त्यांचेसमोर वस्तुस्थिती मांडणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button