
जसे ऊन पडेल तसे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेतली. जसे ऊन पडेल तसे रस्त्यांवरचे खड्डे भरले जाणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी मान्य केले असल्याचे कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या पंधरा दिवसात रस्त्यांची दुरूस्ती झाली नाही तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामांमधील प्रशासकीय त्रुटी आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात डांबरीकरण झाल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यातून शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.www.konkantoday.com