रत्नागिरी जवळील शिरगाव येथे झाडाची फांदी रिक्षावर कोसळल्याने रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रत्नागिरीत येणाऱ्या रिक्षावर झाडाची मोठी फांदी पडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला . उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शाहअजीम महम्मद हुसैन पटेल ( ५२, रा. साखरतर, रत्नागिरी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवार 1 जुलै रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास शिरगाव दत्तमंदिर, रेशनदुकान रस्त्यावर घडली. जखमी शाहअजीम पटेल हे आपल्या ताब्यातील रिक्षा ( एमएच-08-इ-८८८५) घेऊन शाळेतून सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी साखरतरहून रत्नागिरीकडे येत होते. शिरगाव-दत्तमंदिर येथे आले असता अचानक सुटलेल्या वाऱ्याने झाडाची मोठी फांदी तुटून त्यांच्या रिक्षावर पडली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.www.konkantoday.com