कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली, ठाकरे गटाचा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला दणका दिला

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केली असून त्यांनी काँग्रेसच्या रमेश किर यांचा पराभव केला आहे.कोकण पदवीधरमध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे.महायुतीचे कोकणातील सर्व पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतल्यामुळेच महायुतीला यश मिळविता आले. हा विजय आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना समर्पित करतो अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे.राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण हे डावखरेंच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निरंजन डावखरे यांनी हॅट्रीक केली आणि प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यामुळे ⁠कोकण आता 100 टक्के महायुतीचं झालं आहे. ⁠महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. डावखरेंचा विजय ही ⁠कामाची पोचपावती आहे. मुंबई आणि मुंबई संदर्भात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलण योग्य नाही. मात्र लवकरच विधानसभा आहे, त्यावेळी समजेल.ठाकरे गटाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला दणका दिलाय. नाशिक, कोकण आणि मुंबई येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारलीय.मुंबईच्या पदवीधर मतदारसंघात अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघात ज. मो. अभ्यंकर हे विजयी झालेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचाही विजय जळवपास निश्चित मानला जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button