पाईपलाईन खोदामुळे राजापूर-फुपेरे बस मातीत फसली
राजापूर तालुक्यातील पांगरे धरणावरून १३ गाव प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या कामामध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याशेजारी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्याच्या शेजारी करण्यात आलेल्या खोदकामामुळे राजापूर-फुपेरे एसटी मातीत फसली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस उलटताना वाचली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.पांगरे चिंचवाडी धरणावरून जलजीवन मिशन अंतर्गत या परिसरातील १३ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या योजनेत पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम करताना राजापूर रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्यासह गावांमधील वाडीवस्तीमध्ये जाणार्या रस्त्याशेजारीच खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. www.konkantoday.com