रत्नागिरी जिल्हयातून बाहेर जाण्यासाठी 18550 अर्ज प्राप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे जिल्ह्यात विविध लोक अडकून बसली आहेत.जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हात येण्यासाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिला आहे.या अर्जाद्वारे रत्नागिरी जिल्हयातून बाहेर जाणाऱ्यांसाठी अर्ज प्राप्त होणे सुरु झाले असून असे एकूण 18550 अर्ज आज दी ०५/०५/२० सायंकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्हयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्ज प्राप्त होणे सुरु झाले असून असे एकूण 24650 अर्ज आज सांयकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या आणि जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे त्याचे विवरण खालीलप्रमाणे

आपण जर रत्नागिरीतून दुस-या जिल्हयात किंवा राज्यात जाणार असाल तर

    खालील लिंकवर आपली नोंदणी करावी.
https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6

*कोणत्याही अडचण असेल तर जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, किंवा

तहसीलदार कार्यालय येथे संपर्क करावा

आपण जर दुसरा राज्यातून किंबा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हयात येत असाल तर खालील 

लिंकवर नोंदणी करावी.

             https://forms.gle/PHc7wRCpe5tqe4cM6

*आपण त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी कार्यालय / पोलीस स्टेशन यांचेकडे परवान्यासाठी संपर्क करावा. व तसेच परवानगी / पास घेऊनच प्रवास करावा.
अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हयातील नियंत्रण कक्षात खालील क्रमांकावर संपर्क साधावा.फोन नं. 02352- 222233 / 226248
Whats App No. 7057222233

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button