
रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी : तिरुपती, अवाढ उपउपांत्यपूर्व फेरीत
रत्नागिरी : ओम साई स्पोर्टस् आयोजित व ना. उदय सामंत पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे चालू असलेल्या डे – नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 लीग स्पर्धेच्या चौथ्या दिवशी तिरुपती सावर्डे व एन. बी. अवाढ पुणे हे दोन संघ उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहे.
तिरुपती सावर्डे, एन. बी. अवाढ पुणे, ए. बी. आझम मध्य प्रदेश व ऑल मिरकरवाडा या चार संघांमध्ये लढत झाली. यामध्ये तिरुपती सावर्डे व ए. बी. अवाढ पुणे या संघाने या गटातून पुढे मजल मारली. तिरुपती सावर्डे संघाकडून प्रथमेश पवार, ओमकार देसाई, रोहित नार्वेकर, विजय पावले यांनी सुरेख खेळ करत आपल्या संघाला विजयी केले. रोहित नार्वेकर यांनी दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवून संघाला योगदान दिले. तर एन. बी. अवाढ पुणे संघाकडून कृष्णा गवळी, प्रथमेश म्हात्रे, करण अंबाला यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ठ फलंदाजी व गोलंदाजी केली व आपल्या संघाला विजयी केले. ऑल मिरकरवाडा संघाकडून उस्मान पटेल, मुन्ना शेख, कृष्णा पवार, प्रीतम बारी, अनिकेत सानप यासारखे नावाजलेले खेळाडू होते. पण ऑल मिरकरवाडा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र झाला नाही.