हातखंबा येथे कारची दुचाकीला पाठीमागून धडक

रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून पुढील दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी कार चालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 21 डिसेंबर रोजी रात्री 9 वा. सुमारास हातखंबा येथे घडली. जगदीश भागण्णा खेत्री (रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात योगेश फुलचंद मगर (28, मूळ रा. उस्मानाबाद, सध्या रा. पाली, रत्नागिरी ) याने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी रात्री योगेश आपल्या ताब्यातील हंक दुचाकी (एमएच-42-डब्ल्यू-9063) घेऊन पाली ते रत्नागिरी येत होता. त्याच सुमारास जगदीश आपल्या ताब्यातील महिंद्रा लोगन कार (एमएच-01-एआर-7948) घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. ही दोन्ही वाहने हातखंबा येथे आली असता जगदीशचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने योगेशच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला. यात योगेशला दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button