रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी गॅसची वाढती मागणी लक्षात घेवून गेल इंडिया कंपनीकडून सीएनजीचा जादा पुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी गॅसची वाढती मागणी लक्षात घेता आता गेल इंडिया कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्याला आवश्यक असलेला ७५ हजार एससीएमडी इतका गॅसचा पुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर भारत सरकारचा उपक्रम असलेल्या गेल इंडिया कंपनीकडून गॅसच्या पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजी पंपावरील गर्दीचे प्रमाण कमी होवू लागले आहे.रत्नागिरी शहरातील जेके फाईल परिसरातील सीएनजी पंपावर होणारी गर्दी हा चर्चेचा विषय बनत आहे. शहरातील रिक्षा व्यावसायिक आणि सर्वसामान्य वाहनधारक यांची एकच गर्दी झाल्याने या पंपावर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशातच रिक्षाव्यावसायिक आणि वाहनधारकांमध्ये वादाचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हापुरवठा विभाग आणि सीएनजी पंप व्यवस्थापक यांच्यात या बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गॅस व्यवस्थापकांकडून सध्या होत असलेल्या गॅसच्या पुरवठ्यापेक्षा जास्त गॅस आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button