
प्रचितगडावर मजबूत शिडीची उभारणी , आमदार निकम यांचे प्रयत्न
संगमेश्वर तालुक्याचे वैभव म्हणून ओळखला जाणारा सह्याद्रीचा मुकुटमणीी प्रचितगड हा स्वराज्यातील एक अजिंक्य गड. या गडावर शत्रू पोहचणे सोडाच, जाण्याचा कधी विचारही करू शकला नसेल असा हा दुर्गम. शेवटच्या टप्प्यात गडावर नेणार्या शिडीची दुरवस्था झाल्यामुळे शृंगारपूर येथील विनोद म्हस्के या युवकाने सर्व अडचणींवर मात करत गुढी पाडव्ययाच्या मुहूर्तावर नवीन स्टीलची मजबूत शिडी उभारण्याचे काम पूर्ण केले आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशाच्या विविध भागातील गिर्यारोहक आणि पर्यटक प्रचितगड पा हण्यासाठी येत असतात. मात्र शेवटच्या टप्प्यात गडावर नेणार्या शिडीची दुरवस्था झाल्यामुळे जी जीवघेणी ठरत असल्याचे निदर्शनाच येताच चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी दखल घेत शिडीच्या दुरूस्तीसाठी क वर्ग पर्यटन मधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर शिडीचे काम मार्गी लागले. आमदार निकम यांनी तातडीने प्रचितगड विकासात लक्ष घातल्याने इतिहास प्रेमींनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. www.konkantoday.com