
रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पंच परीक्षा नोंदणीचे आवाहन
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनेलवर पंचाची नियुक्ती करण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. ही परीक्षा १८ वर्षावरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे.https://bit.ly/4ckbUOb नोंदणी लिंक देण्यात आली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२४ आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या नोंदणी स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच नोंदणी फॉर्ममध्ये प्रदान केलेल्या MCA QR कोडवर पेमेंट करणे आवश्यक आहे. पेमेंटचा पुरावा (स्क्रिनशॉट) अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर सर्व उमेदवारांना अभ्यासक्रम, स्वरूप आणि परीक्षेचे वेळापत्रक कळवले जाईल.www.konkantoday.com