गुहागर तालुक्यात मुसळधार पाऊस, घरावर संरक्षक भिंत कोसळून नुकसान
गुहागर तालुक्यात सलग दोन दिवस कोसळणार्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता अडूर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे.गुहागर तालुक्यातील अडूर कोंड-कारूळ येथील राजे रमेश जावकर यांच्या घराच्या संरक्षक भिंती शेजारील दिनेश शांताराम असगोलकर यांच्या घरावर पडून घराच्या भिंतीना तडा गेला व छताचे नुकसान झाले आहे. यामध्ये असगोलकर यांचे ७५,००० रुपयांचे नुकसान झाले, तर राजेश जाक्कर यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com