*यंदा “शुभमंगल” धुमधडाक्यात, तब्बल ६१ मुहूर्त*

_यंदा म्हणजेच सन २०२४ मध्ये तब्बल ६१ विवाह मुहूर्त असल्याने यंदाची लग्न सराईत शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे. गेल्या जानेवारीत ८ मुहूर्त निघून गेले असले तरी अजूनही ५३ मुहूर्त बाकी आहे.यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुट्ट्यांचे नियोजन करुन मे महिन्यात लग्न मुहुर्त साधणाऱ्यांची यावेळी मात्र पंचाईत झाली आहे. यंदाच्या मे महिन्यात १ व २ तारीख वगळता मुहुर्त नसल्याने मोठी पंचाईत होणार आहे.यंदाच्या मे महिन्यात हिंदू पंचागानूसार व विवाह ज्योतिष पंडिताच्या अभ्यासानूसार मे महिन्यात शुक्राचा अस्त सांगीतला आहे. या काळात विवाह व अन्य शुभ कार्य वर्ज्य मानले जाते. या काळाला बुडी सुद्धा संबोधले जाते. तरीही २०२४ फेब्रुवारीत १६, मार्च मध्ये ८, एप्रिल ४, जुलै ९, नोव्हेंबर ८ व डिसेंबर ८ असे तब्बल ५३ मुहुर्त असल्याने यंदा शुभ मंगल धुमधडाक्यात होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button