रामदास कदम यांचे वक्तव्य चुकीचे -रमेश पांगत
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीतील कुणबी भवनाबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याची टीका कुणबी समाजोन्नती संघ दापोली ग्रामीणचे अध्यक्ष रमेश पांगत यांनी पत्रकार परिषदेत केले.रमेश पांगत म्हणाले की, कुणबी समाज भवनाचा प्रश्न गेली ४० वर्षे प्रलंबित आहे. मात्र या निवडणुकीत पूर्वीच भाजपचे स्थानिक नेते केदार साठे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांच्याशी आपली भेट घालून दिली. खेड व रत्नागिरी येथे झालेल्या दोन भेटीदरम्यान रविंद्र चव्हाण यांनी कुणबी भवनाकरिता १८ गुंठे जागा खासगीरित्या विकत घेवून समाजाला देण्याचे आश्वासन दिले होते. ही वस्तुस्थिती रामदास कदम यांनी नाकारली असून शिवसेना शिंदे गटाने कुणबी भवनाला जागा दिल्यानंतर, भाजपला जाग आल्याची टीका रामदास कदम यांनी केली. हे चुकीचे असल्याचे मत रमेश पांगत यांनी व्य्कत केले.www.konkantoday.com