
इयत्ता नववी, दहावीच्या विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कमी करण्याची शिक्षक मंडळाची मागणी
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी, दहावीच्या विज्ञान विषयांचा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
अनलॉकअंतर्गत महाराष्ट्र शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तालुक्यातील बहुतांशी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही अनेक कारणांमुळे सर्व शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
www.konkantoday.com