
अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
साधारणपणे 100 खोल्यांचं प्रशस्त महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात. यात्री येत असतात. तर त्यांना राहण्यासाठी चांगली जागा इथे निर्माण करायची आहे, असंही त्यांनी सांगितलंय.
अयोध्या: अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठीही जागा मागणार आहोत. साधारणपणे 100 खोल्यांचं प्रशस्त महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे येत असतात. यात्री येत असतात. तर त्यांना राहण्यासाठी चांगली जागा इथे निर्माण करायची आहे, असं युवा सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत. आदित्य ठाकरेंनी आज अयोध्येत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.
मी अयोध्येत चौथ्यांदा येत आहे, उत्साह तसाच आहे, जल्लोष तसाच आहे. मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक मग ते महाराष्ट्रातून असतील, यूपीमधून असतील हे इथे आलेले आहेत. अयोध्येत आलेले आहेत. राम जन्मभूमीत आलेले आहेत. रामलल्लाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. माझ्यासोबत आपण सगळेच मित्रमंडळी आहात. आमच्यासोबत जो काही उत्साह आणि जल्लोष आहे, त्याचं पण थोडं चित्रीकरण करावं आणि महाराष्ट्राला दाखवावं, कारण हा एक वेगळा विषय आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
2018 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर अयोध्येत आलो होतो. तेव्हा त्यांनी घोषणा केली होती, पहिले मंदिर फिर सरकार, योगायोगानं आम्ही जेव्हा नोव्हेंबर 2018 मध्ये आलेलो तेव्हा ती घोषणा झाल्यानंतर कदाचित असं पूर्ण घडून आलं की, लगेचच कोर्टाची जी काही प्रक्रिया होती, त्याला चालना मिळाली. एका वर्षात बरोबर नोव्हेंबर 2019ला कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निकालामुळे आज मंदिर निर्माण होत आहे. कोर्टाचे आभार आम्ही मानतच आहोत. इथे येणं ही आमची तीर्थयात्रा आहे, राजनैतिक यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाहीत. दर्शन घ्यायला आलेलो आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांशी बोलणार आहेत, असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. पत्रव्यवहार करणार आहेत आणि अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठीही जागा मागणार आहोत.
www.konkantoday.com