
कोकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती, मत्स्यगंधा ३० पासून पनवेल स्थानकापर्यंत धावणार
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील फिटलाईन क्रमांक ८ च्या देखभालीसाठी ३० दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे नेत्रावतीसह मत्स्यगंधा एक्सप्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकातून सुटतील. दोन्ही एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत संपणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जाहीर केले. एलटीटी स्थानकातील फिटलाईन क्रमांक ८ च्या देखभालीच्या कामांमुळे नेत्रावती एक्सप्रेस व मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या प्रवाशांना इच्छितस्थळ गाठताना महिनाभर यातायात करावी लागणार आहे. १६३४६ क्रमांकाच्या तिरूवअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकापर्यंत धावेल. १२६२० क्रमांकाची मंगळूर-एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसही ३० जून ते ३० जुलै दरम्यान पनवेल स्थानकापर्यंत धावणार आहे. परतीच्या प्रवासात १६३४५ क्रमांकाची एलटीटी-थिरूवअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस १ ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकातून सकाळी १२.५० वाजता सुटेल. १२६१९ क्रमांकाची एलटीटी-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेल स्थानकातून सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल. www.konkantoday.com