सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी! विरोधकांचा सरकारवर हल्ला!! चहापानावर बहिष्कार!!!

मुंबई : राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार, उद्योजक या सर्वच घटकांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची झळ बसली आहे. परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम या सरकारच्या काळात झाले आहे. पुण्यासह अनेक शहरे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहेत. प्रत्येक कामात दलाली घेतली जात आहे. अशा या सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे, अशी टीका करत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले.पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.शेतकरी, विद्यार्थी, कामगार, उद्योजक आदी सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना हमीभाव दिला गेला नाही. पीकविमाच्या नावाने विमा कंपन्यांनी प्रचंड पैसा कमविला. शेतकऱ्याच्या बियाणे, खत, अवजारे यांना जादा जीएसटी आकारण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा नतभ्रष्ट, भ्रष्टाचारी सरकारच्या चहापानाला जाण्याचे टाळल्याचे विरोधी नेत्यांनी जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button