
जमिन विकत घेतली म्हणून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल
चिपळूण कामथे हरेकरवाडी येथील दोन वर्षापूर्वी विकत घेतलेल्या जमिनीला कंपाऊंड घालण्यास सुरूवात केली म्हणून सुरेश गंगाराम निर्मल याला गैरकायदा जमाव करून बेदम मारहाण केली म्हणून प्रकाश घाणेकर व अन्य पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुरेश निर्मल यांनी दोन वर्षापूर्वी वाडीतील विजय घाणेकर यांचेकडून जमीन विकत घेतली होती. ही गोष्ट आरोपी प्रकाश घाणेकर व अन्य जणांना मान्य नव्हती. सदर जमिनीत निर्मल हे कंपाऊंड घालायला गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. तर दुसर्या फिर्यादीनुसार फिर्यादी काशिनाथ विठ्ठल घाणेकर यांना जमिनीच्या वादावरून मारहाण केल्याच्या आरोपावरून सदाशिव गंगाराम निर्मळ व अन्य १३ जणांविरूद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील तीनजण जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com