रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये ४ दिवस, जोरदार पावसाचे ; यलो अलर्ट जारी
मुंबई – दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मुंबईत गेल्या २४ तासांत काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच २७ जून रोजी ठाणे, मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.२८ जून आणि ३० जून रोजी रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील ४ दिवस जोरदार पावसाचे राहणार असल्याने येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातही २६ ते ३० जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुढील ४ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. साताऱ्यातही पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये तसेच गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानचा आणखी काही भाग, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग, पूर्व उत्तर प्रदेशातील बहुतांश भाग, पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाबचा उत्तर भाग आणि हरियाणाच्या उत्तर भागात पोहोचण्यासाठी पुढील ३-४ दिवसांत परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.*वायव्य भारतात पावसाचा जोर वाढणार*येत्या ३-४ दिवसांत पश्चिम द्वीपकल्पीय किनारपट्टीवर आणि २७-३० जून दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ ते ३० जून दरम्यान वायव्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मान्सून भारतीय द्वीपकल्पीय भागातून पुढे सरकत असल्याने दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे,