रत्नागिरी नजिकच्या गयाळवाडी येथे घरासमोर उभी केलेली कार अज्ञाताने लांबवली

रत्नागिरी नजिकच्या गयाळवाडी येथे घरासमोर उभी करून ठेवलेली कार अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.जीवन मोहन डोर्लेकर (३५, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन यांनी आपल्या मालकीची इको कार (एमएच ०८ झेड ९१२) ही २३ जून २०२४ रोजी आपल्या गयाळवाडी येथील घरासमोरील जागेत उभी करून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास त्यांची ही गाडी अज्ञाताने चोरून नेली, अशी तक्रार जीवन यांनी शहर पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरूद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button