
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीची नवीन कार्यकारिणी जाहीर : नूतन अध्यक्ष रोटे. मनोज पाटणकर
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वर्ष २०२०-२१ सालसाठी कार्यकारिणी जाहीर झाली असून आज अध्यक्ष पदाचा कार्यभार रोटे. मनोज पाटणकर यांनी स्वीकारला, सचिव म्हणून रोटे. परेश साळवी, तर खजिनदार म्हणून रोटे. ऋता पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१९-२० सालच्या प्रेसिडेंट रोटे. वेदा मुकादम यांनी रोटरीचे २०१९-२०चे असिस्टंट गव्हर्नर रोटे. देवदत्त मुकादम, रोटरीचे नूतन असिस्टंट गव्हर्नर रोटे. समीर इंदुलकर यांच्या उपस्थीतीत अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षांकडे सुपूर्त केली
यावेळी रोटे. सचिन शिंदे, रोटे. जयेश काळोखे, रोटे. नीता शिंदे उपस्थित होते, तर लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इतर सदस्यांनी ‘झूम मिटिंग’च्या साहाय्याने उपस्थिती दर्शवली.
www.konkantoday.com