
चिपळूण रेल्वे स्थानकातील गैरसोयी तत्काळ दूर कर करण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरील वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानकातील काही अपुर्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी यासंदर्भात तातडीने उपाययोजना करून रेल्वे स्थानकातील गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी स्टेशन मास्तर देवदंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण हे औद्योगिक व सांस्कृतिक वारसा असलेले शहर, तालुका आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात दैनंदिन हजारो प्रवाशांचे इतर ठिकाणी येणे-जाणे होत असते. त्यामुळे रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटावर (प्लॅटफॉर्म) संपूर्ण परिपूर्ण निवारा सुसज्ज शेड उभारून बसण्यासाठी व्यवस्था सोयीयुक्त पहिल्या ते शेवटच्या डब्यापर्यंत असावी. कारण प्रवासी पाऊस आणि उन्हात उभे असतात. रेल्वे स्थानकात शौचालयांची स्वच्छता दैनंदिन असावी. रेल्वेच्या थांबण्याच्या डब्याचे नियोजन योग्य सूचनेप्रमाणे नसल्याने प्रवाशांची धावपळ होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, अपंग व महिलांना फारच त्रास होतो. रेल्वे येणे-जाण्याचे वेळेचे नियोजन वारंवार वेळेनुसार होत नसल्याने ग्रामीण भागातून येणार्या प्रवाशांची सर्वच दृष्टीने गैरसोय होत असते. त्यामुळे सुसज्ज वेटींग रूम व उत्तम सुविधापूर्ण हायजेनिक कँटींग असावी, जेणेकून प्रवाशांच्या सर्वच दृष्टीने गैरसोयी दूर होतील.www.konkantoday.com