
जिल्ह्यात पडणार्या दमदार पावसाने भातलावणीची शेतकर्यांची लगबग
खरीपाच्या पेरण्या करून दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेलाय. रोपेही आता लावणीस तयार झालीत. आता तर जिल्हाभरात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेत लावणीच्या कामांसाठी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांची संख्या चांगलीच लगबग वाढली आहे. जिल्ह्यात एकूण ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक भागात भातशेती लावणीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. www.konkantoday.com