
विकासकामे सुरू तरीही शासनाकडून कंत्राटदारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार
रत्नागिरीत अनेक विकासकामे सुरू असताना या झालेल्या कामांचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक होवू लागली आहे. ठेकेदारांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यात तातडीने लक्ष न घातल्यास राज्यभर २७ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा येथील ठेकेदारांनी दिला आहे.रत्नागिरीतही याबाबत आंदोलनाचे निवेदन ठेकेदारांनी दिले आहे. मागील आर्थिक वर्षात राज्यात जवळपास १ लक्ष कोटींची विकासकामे सुरू आहेत. ठेकेदारांनी १० कोटी रुपये अनामत शासनाकडे जमा केल्याचे सांगण्यात आले. राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारणासारख्या अनेक योजनांची गतवर्षी १ लाख कोटीची विकासकामे सुरू आहेत. अनेक छोटे मोठे कंत्राटदार ही काम करीत आहेत. मात्र कंत्राटदारांच्या प्रश्नांकडे लढा देण्यास शासनाला वेळ नसल्याचे दिसले. ठेकेदारांच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.विकासकामे करणार्या ठेकेदारांची देयके तातडीने देण्यात यावीत. यावर कंत्राटदार त्यांच्याकडे कामे करणारे कामगार, अन्य व्यावसायिक यांची वर्षानुवर्षे देयके रखडली जात आहेत. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत असून उपासमारीची वेळ आली आहे.www.konkantoday.com