
दापोली शहरातील स्वप्निल ट्रेडर्स मोर्बाल शॉपीतून १ लाख किंमतीचे ५ मोबाईल लंपास
दापोली शहर बाजारपेठेतील स्वप्निल ट्रेडर्स या मोबाईल शॉपीमधून भरदिवसा सुमारे १ लाख ११ हजार ८६४ रुपये किंमतीचे ५ मोबाईल अज्ञाताने लंपास केले. मे महिन्यात घडलेल्या या घटनेची नोंद नुकतीच पोलीस ठाण्यात करण्यात आली.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी दुपारी २ वाजता स्वप्निल ट्रेडर्स या दुकानामध्ये कुरिअरने मोबाईल असलेले बॉक्स पार्सल आले. हे पार्सल स्वप्निल ट्रेडर्सचे मालक स्वप्निल मालू यांचे भाऊ सचिन सुभाष मालू यांनी ताब्यात घेतले. हा बॉक्स दुकानाच्या काऊंटर टेबलाच्या खालील बाजूस ठेवलेला होता. मात्र सायंकाळी ४ वाजता येवून पाहिले असता सदर बॉक्स त्या ठिकाणी स्वप्निल यांना दिसून आला नाही. त्यानंतर २२ मे रोजी स्वप्निल मालू मुंबई येथे महत्वाच्या कामासाठी कुटुंबासोबत केले. तेथून ते २५ जून रोजी ते परत दापोली येथे आल्यानंतर चोरीची खात्री झाल्यावर उशिराने दापोली ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. याबाबत अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवलकर करीत आहेत.www.konkantoday.com