रत्नागिरी शहरालगतच्या मिर्या बंदर येथे शॉक लागून गाय, म्हैस दगावली
रत्नागिरी शहरालगतच्या मिर्या बंदर येथे विजेच्या धक्क्याने गाय व म्हशीचा मृत्यू झाला. शॉक येत असलेल्या पथदीपाच्या पोलला या गायींचा व म्हशीचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिर्या बंदर येथील रहिवासी चंद्या पेडणेकर यांच्या मालकीची ही जनावरे होती. पोलला नेमका कशामुळे शॉक आला याची तपासणी महावितरणकडून करण्यात येत आहे.मिर्या बंदर रेथील रहिवासी चंद्या पेडणेकर यांनी २१ जून रोजी नेहमीप्रमाणे आपली म्हैस व गाय चरण्यासाठी सोडली होती.www.konkantoday.com