हातिवले, सावर्डे येथील उत्खननाची इटीएसद्वारे मोजणी होणार
हातिवले, सावर्डे वारेमाप उत्खननाबाबत राजापूर, चिपळूण उपविभागीय अधिकार्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या घटनास्थळाला भेट देवून पाहणी व पंचनामा करून त्या बाबतचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आणखी वेगवेगळ्या २० ते २३ प्रकल्पांद्वारे अशा प्रकारे वारेमाप उत्खनन सुरू असून याची इटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन) मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अतिरिक्त उत्खननावर तिप्पट दंड आकारून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.हातिवे (ता. राजापूर), सावर्डे (ता. चिपळूण) येथील कमी रॉयल्टी भरून वारेमाप उत्खनन केल्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. हातिवले, सावर्डे वारेमाप उत्खननाबाबत राजापूर, चिपळूण उपविभागीय अधिकार्यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. हातिवले येथे संपूर्ण डोंगर कापण्याचे काम सुरू आहे. त्यांनी मोजक्याच ब्रासची रॉयल्टी भरली आहे. त्यापेक्षा वारेमाप उत्खनन केल्याची तक्रार आहे. www.konkantoday.com