वालावलकर रुग्णालयाच्या वतीने रुग्णांसाठी चिपळूण ते डेरवण मोफत बस सेवा
कोकणातील वालावलकर रुग्णालय हे वैद्यकीय सुविधा पुरवण्यात कायमच अग्रेसर आहे. सावर्डे आणि डेरवणसारख्या गावांच्या वेशीवर चिपळूण तालुक्यातील हे रुग्णालय म्हणजे रुग्णांचा आधार आहे. रुग्णांचा ओघ दिवसेंदिवस वाढता आहे. त्यामुळे रुग्णांना डेरवण येथे येणे सोपे व्हावे आणि जास्तीत जास्त सामान्य लोकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरीता रुग्णालय प्रशासनाने चिपळूण येथून मोफत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.एकाच छताखाली रुग्णाला एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी आणि सर्व वैद्यकीय अधिकारी यांची भेट ही एकाच दिवशी घेता यावी, त्यांचा वेळ वाचावा, लवकर निदान व्हावे व आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीचयोग्य उपचार व्हावेत, हा हेतू ठेवून रुग्णालय प्रशासनाने मोफत बससेवेचा निर्णय घेतला आहे. चिपळूण-खेड या भागातील आणि त्यांना जोडणाऱ्या गावांतील लोकांची सोय व्हावी म्हणून किरकोळ आजारांकरीता चिपळूण बहादूरशेख नाका येथे २०१५ मध्ये रुग्णालयाची एक शाखा उभी केली गेली. तेथे प्राथमिक तपासणी व आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी विविध तज्ज्ञ डॉक्टर्सची भेट, एक्स-रे, रक्त तपासणीची सोय देखील करण्यात आली आहे. याचा लाभ अनेक मधुमेह, रक्तदाब असे आजार असणारे रुग्ण घेतआहेत