
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे शासकीय रूग्णालयात वाढत्या समस्यांमुळे रूग्ण हैराण
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे शासकीय रूग्णालयात वाढत्या समस्यांमुळे रूग्ण हैराण नेहमीच चर्चेत असणारे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातील रूग्णांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे समोर येत आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुधारणार असे वाटत असतानाच रूग्णालयातल्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येवू लागले आहे. जिल्हा रूग्णालयातून दिवसाला सरासरी चार ते पाच रूग्ण या ना त्या कारणामुळे उपचारासाठी जिल्ह्याबाहेर पाठवण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे.सर्वसामान्यांना वैद्यकीय उपचारात सवलत मिळावी तसेच आर्थिक परिस्थितीमुळे आजारपण कुणाच्या जीवावर बेतू नये यासाठी जिल्हा रूग्णालय कार्यरत आहे. मात्र आता हेच रूग्णालय रूग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे रूग्णांकडून बोलले जात आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रारंभानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा होईल असे सांगण्यात येत होते. मात्र वास्तवतः रूग्णांना येणारे अनुभव नकारात्मक आहेत. www.konkantoday.com