दापोली तालुक्यात आढळली जळलेली मगर

दापोली तालुक्यातील गावतळे येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारी असलेल्या सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती वाकवली (ता. दापोली) येथील सर्पमित्र तुषार महाडीक यांनी वन विभागाला दिली.दापोली परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्र. ग. पाटील, वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव आणि विश्वंभर झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पाहणी दरम्यान विहिरीत मगर आढळून आली नाही. मात्र परिसराची तपासणी केली असता विहिरीपासून दक्षिणेकडे सुमारे ५० मीटर अंतरावर लाकडांची मोठी आग लागलेली दिसून आली. अधिक बारकाईने पाहणी केल्यावर आगीत एक मगर जळत असल्याचे निदर्शनास आले.आग तत्काळ विझवण्यात आली आणि मगरीचा अंशतः जळलेला मृतदेह आणि तोंडाचा शिल्लक भाग तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button