
चिपळुणातील ३७ जि.प. शाळा नादुरूस्त अवस्थेत
शिक्षणाचे धडे देणार्या चिपळूण तालुक्यातील ३७ जिल्हा परिषद शाळा नादुरूस्त झाल्या असून त्या शाळांकडून दुरूस्तीसाठीचे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागानेही नादुरूस्त शाळांचा अहवाल वरिष्ठस्तराकडे पाठवला आहे. विशेष म्हणजे नव्या शैक्षणिक सत्रास सुरूवात झाली असतानाही शाळा दुरूस्तीसाठी वरिष्ठस्तरावून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्यादृष्टीने जैसे थे आहे. www.konkantoday.com