कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग, अहवाल सादर

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल.कोकण रेल्वे सुरु होऊन 31 वर्षे झाली. 1998 पासून तर ती पूर्णपणे सुरु आहे. कोकण,गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूनं धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिथलं निसर्गसौंदर्य तुमच्या जवळ आणून ठेवतात. गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज 75 हून अधिक प्रवासी व मालगाड्यांची ये जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button