
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिणचे माजी जिल्हा संघचालक नारायण वैशंपायन यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिणचे माजी जिल्हा संघचालक आणि शहरातील शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित फाटक हायस्कूल रत्नागिरीचे माजी कौन्सिल सदस्य नारायण तुकाराम वैशंपायन यांचे मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
वैशंपायन यांच्या निधनाने रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आपले त्यांनी संपूर्ण आयुष्य संघ व शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याने एका निष्ठावान स्वयंसेवकाला आणि प्रभावी सामाजिक कार्यकर्त्याला गमावले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




