
खालगाव गोताडवाडीला वादळाचा तडाखा
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गोताडवाडीला वादळाचा तडाखा बसला असून १६ घरांसह ८ गोठ्यांचे सुमारे 23 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.वेगवान वाऱ्यानी घरा, गोठ्यांवरील छपरे, कौले कागदासारखी हवेत उडून गेली. भर पावसात छप्पर उडाल्यामुळे कुटुंबच्या कुटुंब उघड्यावर पडली. काहींना शेजारच्या घरांमध्ये तात्पुरता आश्रय घ्यावा लागला. गावातील भले मोठे झाड वादळात उन्मळून पडले.www.konkantoday.com