
संगमेश्वरमधील आद्या शिरगांवकर झी मराठीच्या ड्रामा ज्युनिअरमध्ये चमकणार
संगमेश्वर बाजारपेठेतील अमोल-स्नेहा शिरगांवकर यांची सुकन्या कुमारी आद्या आता झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर कार्यक्रमांतर्गत चमकणार आहे. रत्नागिरीत झालेल्या निवड चाचणीत आद्याची निवड झाली असून २३ जूनपासून हा कार्यक्रम शनिवार, रविवार रात्री ९ वाजता झी मराठीवरून प्रदर्शित होणार आहे. ड्रामा ज्युनिअरमध्ये निवड झाल्याबद्दल छोट्या गटात शिकणार्या आद्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.संगमेश्वर बाजारपेठेतील पोस्ट कार्यालयाजवळ राहणारे, तसेच चिपळूण बाजारपेठेतील कपड्याचे प्रसिद्ध व्यापारी शिरगांवकर यांची ती सुकन्या आहे. ड्रामा ज्युनिअरसाठी रत्नागिरीत निवड चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये संगमेश्वरमधील ही पाच वर्षाची चिमुकली सहभागी होती. वय कमी असतानाही बिनधास्त व स्टेजवर बोलण्याच्या हिंमतीच्या जोरावर तिने ड्रामा ज्युनिअरमध्ये प्रवेश मिळवला आहे. आद्या ही पाच वर्षांची छोटी कलाकार असून रत्नागिरी झोनमधून तिची निवड करण्यात आली. www.konkantoday.com