
मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगले असते,मंत्री नितेश राणे यांचे विधान चांगलेच चर्चेत
आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांचे एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. मी गोमूत्र फार पितो, ते आरोग्यासाठी फार चांगले असते, असे राणे म्हणाले.त्यांचे हे वक्तव्य सोमवारी दिवसभर चर्चेत होते.
सध्या उन्हाळा आहे. अशावेळी आपण रूह अफजा पिता की, गुलाब शरबत… असा प्रश्न मंत्री नितेश राणे एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, गुलाब आणि रूह अफजा मला कोण देणार, यावर बरंच काही अवलंबून आहे. रुह अफजा मला कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही आणि रूह अफजा नितेश राणेला कोण देईल? तसेही तो फार गोड असल्याने ते मला आवडतही नाही. त्यामुळे मी रुह अफजा वगैरे पित नाही. त्याला जोडूनच नियमित गोमूत्र प्राशन करत असल्याचा गौप्यस्फोट मंत्री राणे यांनी केला.