रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सहा तासाने सुरळीत सुरू

रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने जाताना अपघातग्रस्त एलपी गॅस टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरताना सुरक्षेसाठी कोल्हापूर मार्ग जवळपास सहा तास बंद ठेवण्यात आला होता.काल रात्री 8 नंतर उशिराने या मार्गावरून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.जयगड येथून कोल्हापूरच्या दिशेने जाताना दाभोळे घाटात नियंत्रण सुटून टँकर खोल दरीत बुधवारी सायंकाळी कोसळला होता. यात चालक जखमी झाला. अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होतीwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button