
“पिंपरी चिंचवड ते लंडन” या मोटार प्रवासास अजितदादांनी दाखविला झेंडा
पिंपरी चिंचवड येथील विवेक सोनवणे हे पत्नी व दोन मुलांसह मोटारीने लंडनच्या प्रवासास आज ( शुक्रवारी )निघाले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबईत झेंडा दाखवून या धाडसी प्रवासास शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड शहराचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर चाफेकर पुतळ्याला अभिवादन करून निघालेले सोनवणे कुटूंब मुंबईत दाखल झाले. १२० दिवसांच्या व ३१ देशांमधून होणाऱ्या या प्रवासाची अजितदादांनी आस्थेने माहिती जाणून घेत मराठी माणसाच्या या धाडसाचे कौतुक केले.
वसुधैव कुटूंबम’ व “ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या” हा मेसेज ते जगभरातील नागरिकांना देणार आहेत. अशा प्रकारचा प्रवास करणारे ते पहिले महाराष्ट्रातील कुटुंब असणार आहे.
क्रिडा मंत्री संजय बनसोडे, पत्रकार व लेखक विजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे प्रवक्ते ॲड गोरक्ष लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com