सौदी अरेबियातील मक्का येथे आतापर्यंत १००० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू

सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत १००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे आतापर्यंत १००० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मृतांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे इथली परिस्थिती बिकट बनली आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.मक्का हा एक असा प्रदेश आहे जिथे उष्णतेचा कहर फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येतो. या ठिकाणचे तापमान हिवाळ्यातही लोकांना अस्वस्थ करते. अशातच आता हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. माध्यमंच्या वृत्तानुसार, आतापर्यंत मक्काध्ये १० देशांतील १०८१ हाजींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वाधिक ६५८ लोक इजिप्तमधील होते. याशिवाय भारत, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल आणि ट्युनिशिया येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहेमक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीयांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. यावेळी भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीही जवळपास तेवढेच लोक हजला गेले होते. दुसरीकडे अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या यात्रेकरुंना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक रुग्णालयात त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.हज अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसातील सर्वात उष्ण तासांमध्ये सूर्यप्रकाश टाळण्याची सूचना केली आहे. सौदी लष्कराने यात्रेकरूंच्या मदतीसाठी १६०० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. त्याचबरोबर ३० जलद कृती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button