संघटनेने संधी दिल्यास विधानसभा लढणार व जिंकणारच, माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी केला विश्वास व्यक्त
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातदेखील आता इच्छूक उमेदवार दंड धोपटू लागले आहेत. रत्नागिरीतील शिवसेना ज्यांनी गावोगावी जावून रूजविण्यामध्ये महत्वाचे योगदान असलेले व पाचवेळा वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनाही पक्षाने उमेदवारी दिली, तर रत्नागिरी विधानसभेतून निवडणूक लढणार व जिंकणारच, असा निर्धार शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी यक्त केला आहे. www.konkantoday.com